Emotional Stories in Marathi | मदत करणे हीच खरी सेवा

Motivational Emotional Stories in Marathi | मदत करणे हीच खरी सेवा

Read: Best Emotional Stories in Marathi/Katha: एकदा एक शिक्षक एका परिवारात राहणाऱ्या युवका बरोबर फिरायला गेला. त्यांनी रस्त्यात पाहिलं तर एक जोडी बूट काढून कोणीतरी ठेवले होते. बाजूलाच एक शेत होते, साधारणपणे ते बूट त्या शेतात काम करणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे असावेत. तो शेतकरी आपले दिवसभराचे काम संपवून घरी जायच्या तयारीत होता.

युवकाला वाटले आपण या शेतकऱ्याची गंमत करू, “तो म्हणाला गुरुजी आपण हे बूट कुटे तरी लपवूया, आणि बाजूच्या झाडीत लपून बसूया.शेतकरी आपले बूट नाहीत हे पाहून घाबरेल तेव्हा खूप मज्या येईल.

शिक्षक गंभीर होऊन बोले, “एखाद्या गरीब माणसाची अशी गंमत करू नये. त्यापेक्षा आपण या बुटामध्ये काही सिक्के ठेऊयात आणि लपून बघूया की शेतकरी काय करतो.

त्या युवकाने असेच केले आणि ते दोघेही बाजूच्या झाडीत लपून बसले.

शेतकरी लवकरच आपले काम संपवून आपल्या बूटाजवळ आला. त्याने एक पाय बुटात टाकताच त्याच्या पायाला कठीन असा भास झाला, त्याने बूट हातात घेतला आणि पहिले तर बुटात काही सिक्के होते, त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने ते सिक्के हातात घेऊन अलटून-पलटून पाहिले.

शेतकरी इकडे-तिकडे पाहू लागला, दूर-दूर परियंत कोणी दिसत नव्हते मग त्याने ते सिक्के आपल्या खिशात घातले. आता त्याने दूसरा बूट उचलला, त्यामध्ये पण सिक्के होते… शेतकरी भाऊक झाला,त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, त्याने आपले हात जोडले आणि वर नभा कडे पाहून म्हणाला.

“हे भगवंता माझ्या वेळेवर मला मदत करणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीला माझा लाख-लाख धन्यवाद, त्याची मदत आणि त्याचा तो दयाळू पणा यामुळेच आज माझ्या आजारी बायकोला औषधे आणि माझ्या भुकेल्या मुलाला जेवण मिळू शकेल.”

शेतकऱ्याचे ते बोलणे ऐकून युवकाचे डोळे भरून आले. यावर शिक्षक युवकाला म्हणाला -“तू शेतकऱ्याची गंमत करण्यापेक्षा आपण त्याच्या बुटात सिक्के ठेऊन त्याला जी मदत केली याचा तुला आनंद नाही झाला का ?”

यावर युवक म्हणाला, “आज तुम्ही मला जो धडा शिकवला, त्याला मी माझ्या जीवनात कधीच नाही विसरणार. आज मला ज्या शब्दांचा अर्थ समजला तो आज परियंत कधीच समजला नव्हता की जीवनामध्ये काही घेण्यापेक्षा देण्यामध्येच खरा आनंद आहे. देण्याचा आनंद हा खूप अप्रतिम आहे.

मित्रांनो, खरंच एखाद्याला काहीतरी देणे यामध्ये जे सुख आहे ते इतर कोणत्याच गोष्टीत नाही! या गोष्टीतून आपण शिक्षा घेतली पाहिजे की आपल्या-आपल्या क्षमते नुसार काहीतरी दान केले पाहिजे आणि ज्याला मदतीची गरज आहे, अशा गरजवतांसाठी जीवनामध्ये सतत मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

Read Best Inspirational Stories in Marathi:

 1. साधू ची झोपडी
 2. ५० रुपयाची नोट
 3. पेला खाली ठेवा
 4. तुम्ही हत्ती नाही माणूस आहात

Marathi Story

आपणाकडे जर मराठी मध्ये एखादी प्रेरणादायी गोष्ट, लेख, संगणकाविषयी टिपा, सामान्य ज्ञान किंवा एखादी महत्वपूर्ण माहिती असेल, आणि जर आपण ती आमच्याशी शेअर करू इच्छित असाल तर, ID: hindimotivationalpoint@gmail.com वर आपण ती पाठवू शकता. आम्हाला आवडल्यास आपल्या नाव व फोटो सह ती माहिती आम्ही येथे शेअर करू ! धन्यवाद !

6 thoughts on “Emotional Stories in Marathi | मदत करणे हीच खरी सेवा

 • May 12, 2017 at 3:35 pm
  Permalink

  khup chann marathi story mala shikayala bhetale
  mi paryatn karel dusryan help kanyach
  shairing karanyach

  Reply
  • March 30, 2019 at 7:42 am
   Permalink

   Khup chan gosht…gosht agdi chotI pn SAR khup motha

   Reply
 • August 26, 2020 at 9:22 pm
  Permalink

  Khupach chan goshti aahet. it is really motivational …..khup kahi shikavun jatat…chotya choty goshtinmadhun khupach motha saar milala👍

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *