Marathi Katha With Moral | तुम्ही हत्ती नाही माणूस आहात
Marathi Katha With Moral | तुम्ही हत्ती नाही माणूस आहात
Read Marathi Katha With Moral : एक माणूस रस्त्याने चालत होता. तेव्हा त्याने रस्त्याच्या बाजूला बसलेल्यां हत्तीना पहिले आणि तो क्षणभर थांबला. त्याने पाहिलं कि हत्तीच्या पुढच्या पाया मध्ये एक दोर बांधली आहे, त्याला आश्चर्य वाटले कि हत्ती सारख्या मोठ्या जीवाला लोखंडाच्या साखळी ऐवजी एका छोट्याशा दोरी ने बांधून ठेवले आहे. त्याला माहित होते कि हत्तीच्या मना मध्ये आले तर ते कुटेही आणि केंव्हाही जाऊ शकत होते पण ते अस काहीही करत नव्हते.
त्या माणसाने तिथे उभ्या महावातला विचारले कि हे हत्ती एवढे शांत का उभे आहेत आणि ते येथून पळण्याचा प्रयत्न का नाही करत?
तेव्हा महावाताने सांगितले, “कि या हत्तीना लहानपणा पासूनणच दोरीने बांधून ठेवत. कारण लहान असल्या मुळे हत्ती मध्ये दोरी तोडण्याची शक्ती नसते. हत्तीने सारखा-सारखा प्रयत्न करून सुद्धा दोरी तोडू न शकल्याने यावर त्याचा विश्वास बसे कि तो हि दोरी आता कधीच तोडू शकत नाही आणि तो मोठा होत असताना हा विश्वास अजून मजबूत होई म्हणूनच हत्ती हि दोरी तोडण्याचा कधी प्रयत्नच करत नाहीत.
तो माणूस आश्चर्यात पडला कि हत्ती सारखा विशाल जीव आपलं बंधन आपण तोडू शकतो हे माहित असून देखील अस करत नाही.
या हत्तीन सारखंच आपल्या पैकी कितीतरी लोक फक्त त्यांना मिळालेल्या पहिल्या अपयेशाने मानतात कि आता आपल्या कडून कोणतच
काम होऊ सकत नाही अशी मानसिकता ते मना मध्ये स्वतःच बनवतात आणि आपलं पूर्ण जीवन जगतात.
माणसाने नेहमी लक्षात ठेवल पाहिजे कि असफलता हि एक आपल्या जीवानाचा भाग आहे म्हणून खड्तर प्रयत्न करुनच आपण यशस्वी होऊ शकतो.
जर आपण अशा कोणत्या बन्धनात् आहात जी तुमच्या प्रगतीच्या आड येतील तर अशा प्रकारची सर्व बंधन तोडून टाका…कारण तुम्ही हत्ती नाही माणूस आहात.
Do You want more motivational marathi katha with moral So read:
हि कथा तर एक नंबर आहे भावा खरच खूप छान
Inspiration