Marathi Story With Moral | मराठी कथा
Marathi Story With Moral | मराठी कथा | आज आपण जे करत आहात तेच ठरवेल की उद्या आपण काय करणार?
Read Top Marathi Story With Moral | मराठी कथा :- दुष्काळामुळे माधवपुर गावचे लोक खूप हैराण होते. जमिनीतून पाणी नाहीसे झाल्यामुळे ट्युबवेलने उत्तर दिले….. कि शेतीकरायची असल्यास लवकरच देव इंद्र यांची कृपा होणे गरजेचे आहे.
पण खूप यज्ञ, याग आणि होम केले तरी वरून राजा काय बरसत नव्हता. रोज शेतकरी एका जागी जमून आभाळाकडे पाहून विचार करत होते, की कधी वरून राजाची कुर्पा आमच्यावर होईल आणि आम्ही पुन्हा शेतावर कामाला जाऊ.
रोजच्या सारखे आज पण सर्व शेतकरी पावसाची वाट पाहत पारावर बसले होते, तेवढ्यात एक जन म्हणाला “अरे हा धोंडू कुटे राहिला… दोन तीन दिवसापासून पारावर आला नाही.. गावात कुटे दिसला नाही.. गेला कुटे म्हणायचा? का हा मेहनत मजदुरी करण्यासाठी शेहरात तर गेला नसावा ना? “हि गोष्ट पारावरील लोकांनी हसण्यावारी नेहली, पण पुढील दोन तीन दिवस धोंडू दिसला नाही म्हणून सर्व लोक त्याच्या घरी पोहचले.
“मुला, तुझे बाबा कुटे केला?” त्यांच्यातील एकाने त्या मुलाला प्रश्न केला.
“बाबा शेतावर काम करण्यासाठी गेले आहेत!” हे बोलून मुलगा घराच्या आत पळाला.
असे वाटते की धोंडू या उन्हाळ्यात वेडा झाला आहे! “, कोणीतरी हिसकावून सर्वजण ओरडले.
पण सर्वाना कुतूहल होते कि धोंडू शेतात काय करत असेल, हे पाहण्यासाठी सर्व शेतावर निघाले.
त्यांनी पहिले धोंडू शेतात खड्डा खणत होता.
“अरे! धोंडू! हे तू काय करत आहेस?”
“काही नाही बघ फक्त वरून राजाची वाट पाहत आहे.”
“जिथे मोठे-मोठे जतन केले पाऊस पडला नाही, तिथे तुझी हि छोट्या खड्ड्याची युक्ती काय कामाची.
“नाही नाही ही माझी युक्ती नसून छोटासा प्रयत्न आहे की भविष्यात पाऊस पडेल तेव्हा पाउसाच्या पाण्याचा प्रवाहया माझ्या छोट्याश्या जलाशयामध्ये सोडून खूप सार पाणी साठवता येईल आणि हो कारण पुन्हा जरी पाऊस नाही पडला,तरी थोडे दिवस का होईना यातील पाण्याच्या साठ्याचा मी माझ्या शेतीसाठी उपयोग करू शंकेन.
“या वेळेचा पत्ता नाही आणि तू पुढचा विचार करतोयस… कितीतरी महिन्यापासून आकाशातून पाण्याचा साधा एक टेंब पडला नाही…हि फुकटची मेहनत आहे तुझी आणि तू वेळ ही वाया घालवत आहेस… हे राहूदे चल आमच्या बरोबर परत घरी!”
पण धोंडूने त्यांच्याकडे लक्ष न देता आपले काम चालू ठेवले, काही दिवसातच धोंडूचा जलाशय बांधून झाला.
असेच खूप दिवस झाले पण वरून राजा काय बरसला नाही… पण एक दिवस अचानक रात्री ढगांच्या गडगडासह आणि वीज चमकून जोरदार वरून राजाने बरसायला सुरुवात केली.
मातीचा सुगंद सर्व पंचक्रोशीत पसरला होता… हे पाहून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.. सर्वाना आता असे वाटू लागले होते की आपले वाईट दिवस संपले…
पण थोड्याच वेळात वरून राजा बरसायचा बंद झाला आणि शेतकऱ्याचे सुखावलेले चेहरे कोमेजू लागले.
दुसऱ्या दिवशी सर्वजन शेतावर गेले. पाहता तर काय? शेतातील मातीच वरचा थर भिजला होता. बाकी खाली जमीन सुखीच होती.
पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी विचारात होता, आता कसे होणार अशात आपण फक्त नागरणी करू शकतो, पण पेरणी नाही. हे सर्व पाहून शेतकरी हवाल दिल होऊन घरी निघून गेला.
दुसरीकडे धोंडू आपल्या शेतातील जलाशय भरलेला पाहून आनंददाने थक्क झाला. त्याला खूप आनंद झाला. आनंदात वेळ वाया न घालवता धोंडू ने नांगर उचलला व तो कामाला लागला. काही महिन्यामध्ये माधवपुर गावातील एका शेतकऱ्याचे शेत ऐन दुष्काळातही हिरवे दिसत होते आणि ते शेत होती धोंडूचे.
मिंत्रानो, जर परीस्थिती खराब असेल, तर अनेक लोक ती परिस्तिथी कधी सुधारेल याची वाट पाहत चिंतातूर राहतात. याउलट आपल्याला तयार रहायला पाहिजे, की पाऊस पडला आहे, दुष्काळ संपला आहे व परिस्तिथी बदली आहे. आता आपण काय करू शकतो?
कारण प्रकृतीचा नियम आहे दिवसानंतर रात्र व राती नंतर पुन्हा दिवस हा उजाडतोच.. आपली आपली आजची परिस्तिथी वाईट असेल, तर ती एक दिवस निश्चित बदलेले, वस्तू स्तिथी बदलते, किवा बदलेल पण काय परिस्तिथी बदल्यामुळे तुमी तयार आहात का? या बदलेल्या परिस्तिथीचा फायदा उचलण्यासाठी? एखादी नौकरी ची संधी तुमच्याकड चालून आली तर, त्या आलेल्या संधीचा तुम्ही फायदा घेणार की त्याच्यासाठी तेयारी करणार का फक्त नोकरी नाहीत? ती मिळत नाही असे सांगत, आयुष्यात रडत बसणार, नाही ना?
काय तुम्हाला Acting, Singing किंवा Dancing ची संधी मिळाली. म्हणून तुम्ही जीव ओतून मेहनत करणार की माझी ओळख नाही मला कोण विचारतय असा विचार करून आलेल्या संधीला लाथ मारणार.
बस लक्षात ठेवा.
“आज तुम्ही जे कराल, तेच ठरवेल की तुम्ही भविष्यात काय करणार आहात.”
लक्षात ठेवा! अयशस्वी लोकांच्या गर्दीचा हिसा बनण्यापेक्षा मूठभर यशस्वी लोकांच्या ग्रुपचा भाग बनायचे असल्यास… आज वर Focus करा…. या उचला आपला हाथियार आणि कामाला लागा. कारण उद्या होणारा यशस्वी उद्दीष्टंनचा पाऊस त्यांच्या तैयारीला आजपासून लागा.
Khup Chan. keep writing stories like this.
nice story